हळवं मन बघ किती वाईट असतं
प्रेम करत कुणावर तरी आणि का बरं स्वतःला विसरून बसतं !!
मुळात मन म्हणजे काय आणि असतं कशाला
मन म्हणजे निसर्गाने दिलेलं वरदान आणि असतं कुणावर तरी अफाट प्रेम करायला !!
विधात्याने देखील माणसाला मन देऊन फारच अबोल केले आहे
कारण मनाबरोबर मिळालेल्या भावना देखील त्यालाच सहन करायच्या आहेत !!
'मन' जरी दोन अक्षर असले तरी पण ते समजायला फार कठीण असतं
कारण कोणाला त्याच्यासाठी क्षण तर कोणाला त्याच्यासाठी आयुष्य वेचावं लागतं !!
ही कविता देखील माझ्या एका मनाचाच छोटुसा कवडसा आहे
आणि पूर्ण मन समजावयाला हि कविता पण अपुरीच राहणार आहे !!
एक अनामिक !!
No comments:
Post a Comment