कल्पनेच्या विश्वात नेहमीच मी रमायचो
म्हणूनच तर काय तुझ्या आठवणीत सारखे जगायचो !!
पण स्वप्न आणि वास्तव यात बराच फरक आहे
म्हणूनच तर काय तु माझ्या मनाजवळ असुनदेखील माझी कुठे आहे !!
मी तुझं भविष्य नाही हे बुद्धीला जरी वाटत असलं तरी मन मानीत नाही
कारण माझं हे हळवं मन तुझ्यावाचुन राहूच शकत नाही !!
माझा वर्तमान फार वाईट आहे
कारण तु माझी राहणार नाही हे दुर्दवी भविष्य माझ्या वाटेला येणार आहे !!
माझं केवढ प्रेम आहे हे सांगताच येणार नाही
आणि ते या कवितेतल्या शब्दावाटे व्यक्त करताच येणार नाही !!
एक अनामिक !!
No comments:
Post a Comment